पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा दक्षिण भारत सेलची बैठक मार्केट यार्ड येथे श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच मंडळ सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.24) पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत सेलचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक ाजेश पिल्लई होते.
या बैठकीत भाजप दक्षिण भारत सेल जिल्हा आणि नऊ मंडल समिती सदस्यांना विविध पदांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली. एकूण 98 सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. बैठकीसाठी भाजपचे कोकण विभागातील लोकसभा जागांचे क्लस्टरप्रमुख बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र दक्षिण भारत सेलचे सहसंयोजक रमेश नायर, कोकण प्रदेश संयोजक भाजप दक्षिण सेल गणेश शेट्टी, उत्तर रायगड जिल्हा संयोजक माधुरी श्रीनिवास कोडुरु, राज्य भाजप दक्षिण भारत सेलचे कमिटी सदस्य रवी पिल्लई, डिस्ट्रिक्टचे निमंत्रक कृष्णन सगदेव, कर्जत मंडळचे दिनेश गनिगा, पनवेल ग्राम इं. मंडलचे ताहिर, खारघरचे नवीन हेगडे, सविना बंगेरा, कामोठे मंडळचे अजय आर्य, कळंबोली मंडळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी एकूण 98 नियुक्तीपत्रे देण्यात आली.