Breaking News

प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांच्या भात बियाण्याला पेटंट

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी संजीव प्रभाकर समेळ यांच्या बसझिना (वाडा कोलम) या गावठी भात बियाण्याला भारत सरकारच्या कृषी विद्यापीठाकडून पेटंट प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांचे अभिनंदन केले.
संजीव समेळ यांच्या भात बियाण्याची देशाच्या कृषी विभागाने दखल घेतली असून भारत सरकारचा कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून त्यांना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते दापोली विद्यापीठात पेटंट प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले आहे.
याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांचे अभिनंदन केले. या वेळी भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, पटवर्धन हॉस्पिटलचे सेक्रेटरी राजीव समेळ, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply