
पनवेल ः प्रतिनिधी
भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. पनवेलजवळील एनएच-4 बी पनवेल-उरण मार्गावरील जय माताजी हॉटेलसमोर मंगळवारी (दि. 21) सकाळी सहाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला (क्र. एमएच-04-जेई-9446) धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील गणेश याचा मृत्यू, तर त्याचा सहकारी हर्षल मोहिते जखमी झाला आहे. हर्षल मोहिते याला नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.