Breaking News

उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ

दर्जेदार शिक्षणासाठी कोणतीही तडजोड नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. संस्थेच्या उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ बुधवारी (दि.3) झाला. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस.टी.गडदे, शकुंतला ठाकूर, अनिल भगत, हरिश्चंद्र पाटील, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, प्रकाश भगत, सुरेश पाटील, वसंत पाटील, विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, साईचरण म्हात्रे, अजय भगत, मुख्याध्यापिका राज अलोनी, मुख्याध्यापक महेंद्र काटकर, भार्गव ठाकूर, चंद्रकात घरत आदी उपस्थित होते.
खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलप्रमाणेच उलवे येथील स्कूलमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या शाळेचे शैक्षणिक वर्ष बुधवारपासून सुरू झाले असून यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या शाळेत प्रवेश घेण्याकरिता पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply