Saturday , December 3 2022

पनवेल शहर भाजपतर्फे सेवा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जल ही जीवन आहे पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत कशी करावी, त्याचे संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी दिली. भारतीय जनता पक्ष, श्री. रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडळ आणि सीकेटी कॉलेज, खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि उलवा नोड या ठिकाणी युवानेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 30) रोजी महापालिका क्षेत्रातील महाविद्यालये व शाळांमध्ये ’जल ही जीवन’ या विषयावर निबंध स्पर्धा तीन गटांमध्ये होणार आहे. गट पहिला 5 वी ते 8 वी, गट दुसरा 9वी ते 12 वी आणि गट तिसरा महाविद्यालयीन विद्यार्थी. ही स्पर्धा  मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत होणार आहे. यामध्ये  60 शाळा व महाविद्यालयातील 12 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटात पहिल्या क्रमांकाला तीन हजार रु., दुसरा दोन हजार रु., तिसरा एक हजार रु. आणि तीन उत्तेजनार्थ प्रत्येकी 500 रुपये बक्षीस दिले जाणार आहे. खारघर, कामोठा, कळंबोली, पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि उलवा नोड या ठिकाणी शनिवारी (दि. 1) सकाळी 8 वाजता जलसंवर्धन रॅलीचे आयोजन करण्यात आली आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि भाजपचे  कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. महानगरपालिकेच्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव, तथा इतर पदाधिकार्‍यांसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग संदर्भात निवृत्त उपायुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका सुप्रभा मराठे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रविवारी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजन करण्यात आले असून या वेळी आमदार प्रशांत ठाकूर ही मार्गदर्शन करणार आहेत. व्याखानाच्या माध्यमातून  संस्था सदस्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत सजगता निर्माण करून पाणी वाचविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करता येईल. शासनातर्फे पाण्याची बचत करणार्‍या सोसायटीसाठी मालमत्ता करात सवलत ही दिली जाणार असल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी दिली आहे.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply