Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे उद्घाटन

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून चावडी आणि शौचालय

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 8, 5, 7 आणि 4 येथील गार्डनमध्ये विविध कामे करण्यात आली होती. या कामांचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) झाले.
पनवेल महापालिकेतील सत्तधारी नगरसेवकांच्या माध्यमातून विकासाची विविध कामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्यालाच अनुसरून महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल येथील गार्डन्समध्ये चावडी आणि शौचालय बांधण्यात आले आहे. या कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या उद्यानांमध्ये येणार्‍या नागरिकांना सुविधा उपलब्ध झाली आहे. याबद्दल नागरिक महापौर आणि महापालिकेला धन्यवाद देत आहेत.  
उद्घाटन समारंभास नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, महादेव मधे, नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस किशोर चौतमोल, महेंद्र वावेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply