Breaking News

वीर वाजेकर महाविद्यालयात कोरियन विद्यार्थांचा परिसंवाद

उरण : रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने स्ट्राँग माइण्ड आणि माइण्डसेट या विषयावर दक्षिण कोरियन विद्यार्थ्यांचा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे होते. या परिसंवादात दक्षिण कोरियातील किम दो क्योम, कियो हाँग व डोकम किम यांनी सहभाग घेतला होता. या परिसंवादात किम दो क्योम यांनी स्ट्राँग माइण्ड आणि माइण्ड सेट या विषयावर दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वेगवेगळ्या स्लाईडस्च्या माध्यमातून कणखर मन व कमकुवत मन यातील फरकही किम दो यांनी स्पष्ट केला.   या परिसंवादात दुभाषिक म्हणून कोल्हापूरचे प्राजक्त पन्हाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. बी. पाटील यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. डी. टी. देवडकर यांनी मानले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply