भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे कळंबोलीत प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्यातील महायुतीचे सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. 14) कळंबोली येथे केले. त्या नारीशक्ती सन्मान सोहळ्यात बोलत होत्या.
पनवेल महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली सेक्टर 1 इ मधील नवीन सुधागड शाळेत नारीशक्ती सन्मान सोहळा, विद्यार्थी गुणगौरव, महिलांसाठी खेळ पैठणीचासह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोनिका महानवर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, प्रकाश महानवर, प्रभाग अध्यक्ष रामा महानवर, बबन बारगजे, संदीप म्हात्रे, आबा घुटुगडे, सुनील ठोंबरे, संदीप म्हात्रे, संजय दोडके, कळंबोली सरचिटणीस दुर्गा सहानी, शुभांगी निर्मळे, शोभा माने, अपर्णा सरोज, रेणूका जाधव, वनिता येरकर, साक्षी गावडे, निशा नेवसे, प्रियंका सोनवलकर, लैला शेख, रानी रानपूर, बायजा बारगजे, आशा मालव, रामदास महानवर युवा मंचचे शुभम रास्कर, प्रवीण मोरे, प्रशांत शिंदे, तुषार कोकरे, रणजीत जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी 10 महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.