पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 8) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी मंगळागौर, फॅशन शो, उखाणे स्पर्धा तसेच इतर विविध स्पर्धा रंगल्या. त्यास महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी महिलांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, शकुंतला ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस चारुशीला घरत, नितीन पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कमला देशेकर, शहराध्यक्ष राजश्री वावेकर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, माजी नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, नीता माळी, रूचिता लोंढे तसेच सपना पाटील, उल्हास झुंजारराव, प्रीतम म्हात्रे, स्वाती कोळी, आयोजक सुमित झुंजारराव, कोमल कोळी, शिवानी घरत, नूतन पाटील, निकिता फडके, प्रवीण मोरबाळे, संदीप पाटील, वरुण डांगर, प्रशांत शेटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत असून स्त्रीशक्तीने देशासह राज्याचे नेतृत्व करावे यासाठी पावले उचचली जात आहेत आणि त्याला वेगवेगळ्या संस्थांचीदेखील साथ मिळत आहे. त्यामुळे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे बोलताना केले.
या वेळी नितीन गवळी यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम झाला. यामध्ये प्रथम क्रमांक अर्चना पाटील, द्वितीय क्रमांक ज्योती चौधरी, तृतीय क्रमांक स्वाती पवार, चौथा क्रमांक रंजना जगनाडे, पाचवा क्रमांक विद्या सावंत आणि सहावा क्रमांक कमला देशेकर यांनी पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे अन्य विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याशिवाय कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …