Saturday , June 3 2023
Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

सिद्धार्थ आणि ओमचे मान्यवरांकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी चकमदार कामगिरी करून भारतीय संघात उत्तुंग झेप घेतली आहे. सिद्धार्थ मिश्रा आणि ओम झावरे यांची बॉक्स लंगडी या खेळामध्ये भारतीय संघात राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

सिद्धार्थ अनंतकुमार मिश्रा आणि ओम संदीप झावरे या विद्यार्थ्यांनी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत घवघवीत यश संपादीत केले होते. त्यात त्यांनी रायगड जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करत तृतीय क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेतून त्यांची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली होती. त्यातही त्यांनी महाराष्ट्राला द्वितीय क्रमांक मिळवून दिला होता. त्यांची ही कामगिरी पाहता त्यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करत

त्यांना पुढील वाटाचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लीक स्कूलच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या अर्चना खाडे-चव्हाण, क्रीडा शिक्षक सूरज चव्हाण यांच्यासह पालक उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply