Breaking News

पिगोंडे ग्रा.पं.कडून गटारांचे बांधकाम

नागोठणे : प्रतिनिधी

Exif_JPEG_420

विभागातील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आणि आंबेघर या दोन गावात गटारे बांधण्याच्या कामाला वेगाने प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून हे बांधकाम केले जात आहे. दोन्ही गावांत प्रत्येकी पाचशे मीटर लांबीची गटारे बांधण्यात येणार असून, दोनशे मीटरहून जादा बांधकाम पूर्ण झाले आहे. संपूर्ण बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सरपंच संतोष कोळी यांनी स्पष्ट केले.

गटारांच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर या कामात काहीतरी त्रुटी असल्याबद्दल रोहे पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली होती. या बाबत सरपंच कोळी यांना विचारले असता, येथील एका स्थानिक व्यक्तीच्या तक्रारीनंतर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी येथे येऊन पाहणीसुद्धा केली होती व त्यांच्या दृष्टीने चाललेले बांधकाम उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय देण्यात आला होता, असे कोळी यांनी या वेळी सांगितले. वेलशेत आणि आंबेघर गावात चाललेल्या गटारांच्या बांधकामावर माझे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचार्‍यांचे  लक्ष असल्याचे सरपंच संतोष कोळी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply