पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रात महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना या आजीवन सुरू राहतील आणि त्यांचा फायदा प्रत्येक लाभार्थ्याला होईल, मात्र महायुती सरकारने लोकांच्या हितांसाठी सुरू केलेल्या योजनांचा अपप्रचार महविकास आघाडीकडून सुरू आहे. त्यामुळे महायुतीने समाज कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत जागरूकपणे पोहचवावी, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 17) केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पनवेल शहर विस्तारित कार्यकारिणीची बैठक खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहर अध्यक्ष अनिल भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या बैठकीला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अॅड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, चिटणीस रमेश मुंडे, ब्रिजेश पटेल, अमरीश मोकल, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, संदीप पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अॅड. वृषाली वाघमारे, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, नीता माळी, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, पनवेल शहर उपाध्यक्ष अमित ओझे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील राणा, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, विनायक मुंबईकर, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रूपेश नागवेकर, सुहासिणी केकाणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीचे काम केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून पुढे म्हटले की, प्रत्येक घरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या योजनेचा लाभार्थी आहे. आपले सरकार योजना बंद करणारे महविकास आघाडीचे सरकार नसून लोककल्याणकारी योजना राबवणारे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे ज्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना आजिवन चालू राहतील, मात्र विरोधक याचा अप्रपचार करत आहेत. ते लक्षात घेता कार्यकर्ता म्हणून आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून उपयुक्त माहिती तसेच आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहचवा. आपल्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला महत्त्व आहे, ते आपण ओळखून असून समाजालाही प्रभावीपणे दिसायला पाहिजे यासाठी सर्वांनी सज्ज व्हा.
उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिवाश कोळी यांनी या बैठकीतून आपण विधानसभा निवडणुकीची तयारी आजपासून सुरू करा, असे आवाहन कार्याकर्त्यांना केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना जे मतदान झाले होते त्यापेक्षा जास्त मतदान आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवून देऊन असा निर्धार करा तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघातील आपले मताधिक्य अधिकाधिक कसे वाढेल असा संकल्प करून सर्व पातळीवर भाजपचे काम पोहचवा आणि नवीन मतदार नोंदणीवर भर द्या, असेही त्यांनी सूचित केले.
प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी राज्यात पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून केंद्र आणि राज्य सरकारची कामे तळागळातील, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा निश्चय करा, असे सांगितले.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून अजय देवनारायण तिवारी आणि सुमन शुक्ला यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे भाजप उत्तर भारतीय मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …