Breaking News

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्वेस्टीचर समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये द्वितीय इन्वेस्टीचर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, शकुंतला ठाकूर, स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, रायगड विभागीय निरीक्षक मोहन कोंगेरे, उपनिरीक्षक विलासराव जगताप यांच्यासह खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, भाजप उलवे नोड 1चे अध्यक्ष निलेश खारकर, कविता खारकर, स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी रयत गीत व स्वागत गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. स्वागत नृत्यही सादर करण्यात आले. क्रीडा शिक्षक संग्राम फोफेरकर आणि संगीत शिक्षक हर्षल फडके यांच्या प्रशिक्षणातून बँड पथकामार्फत विद्यार्थी संचलन करून स्टेजवर आले. त्यांना मान्यवरांकडून शपथ, स्लॅश व बॅच देण्यात आले.
समारंभाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले विचार मांडून मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती असलेले गट शिक्षणाधिकारी सीताराम मोहिते यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले व पनवेलच्या सर्व शाळांमध्ये असे कार्यक्रम व्हावे, अशी भावना व्यक्त केली, तर स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर यांनी अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी कशी मदत होते याबाबत मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

पेठालीच्या मैदानात आमदार चषक 2025 स्पर्धा; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री कृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने माजी सरपंच संतोष पाटील …

Leave a Reply