Breaking News

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष; तीन पोलीस निलंबित

पुणे ः प्रतिनिधी : अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करणे ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालू असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले आहे़. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीरद्दीन चमनशेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार डी़. सी़. बेंद्रे व डी. एऩ. गायकवाड अशी त्यांची नावे आहेत़.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयसीआयसी बँकेसमोरील सुखकर्ता एंटरप्रायझेस दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून 30 हजार 670 रुपयांची जुगाराची साधने जप्त केली़. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली बीट अंतर्गत वाघोली गावातील खांदवेनगर येथे पत्र्याच्या शेडलगत जुगारावर छापा घातला होता़. कल्याण मटका चालविणार्‍या 6 जणांविरुद्ध कारवाई करुन 13 हजार 810 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले होते़. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या कर्मचार्‍यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली़. या कर्मचार्‍यांनी कारवाईत दिरंगाई केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात आले़. अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे धोरण राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत़.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply