पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी प्रश्नावर गुरुवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, एमजीपीचे उपकार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, उपअभियंता वायदंडे, सिडकोचे कार्यकारी अभियंता गायकवाड आणि ठेकेदार उपस्थित होते. या वेळी न्हावाशेवा टप्पा 3 योजनेचा आढावा घेण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले की, सप्टेंबरअखेर न्हावाशेवा टप्पा 3 या योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, पण कंत्राटदराने यामध्ये प्रचंड दिरंगाई केलेली आहे. त्यामुळे या कामाला वेळ लागतोय. या संदर्भात आता फिजिकल रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. या कामांमध्ये असलेले पाईपलाईचे लेइंग, मूळ स्रोतापासून शुद्धीकरण केंद्राचे पाणी आणण्यापर्यंतचे काम असेल तिथे पंपिंग मशनरी बसवणे तसेच कळंबोली रोहिंजणपर्यंत पाईपलाईनचे लेइंग आहे. या प्रत्येक कामाचे डिटेल, त्यांनी लागणारी मुदत याचा आढावा घ्यायला सांगितले. एक आठवड्यात त्याच्यासाठीची माहिती त्यांच्याकडून येणे अपेक्षित आहे. ते पूर्ण झाल्यावर पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर आणि पनवेल शहराचा महापालिकेचा भाग त्या सगळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा दूर होईल.
आमदार प्रशांत ठाकूर आणि पालकमंत्री उदय सामंत यांची पनवेलच्या पाणी प्रश्नासंदर्भात गेल्या महिन्यात बैठक झाली होती. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत बैठक झाली. आता पुढच्या आठवड्यात सिडको परिसरातील सप्लायमधील पाण्याच्या तुटवड्यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
पनवेल परिसरातील पाण्याची अडचण दूर होऊ शकते. त्यासाठी महापालिका, सिडको आणि एमजेपी या सगळ्यांनी एकत्र काम केले पाहिजे, असा आग्रह या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी धरला. या संदभात येणार्या सात दिवसांमध्ये काय काम शक्य होणार आहे आणि काय केल्यामुळे महापालिकेला, सिडकोला पाच एमएलडी, दहा एमएलडी पाणी वाढीव मिळू शकते अशा अॅक्टिव्हिटी या पाण्यासाठी मॉनिटरिंग करण्याकरिता त्यांनी कामाला सुरुवात करावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केले.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …