Breaking News

स्व. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानचे कार्य सुरू रहावे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्व. मुग्धा लोंढे यांनी आपले आयुष्य हे समाजसेवा करण्यासाठी दिले. दुर्दैवाने त्या आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या स्मृति या सेवाकार्यातून रहाव्यात यासाठी स्व. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यामातून विविध उपक्रम राबवले जातात. आगामी काळातही अशीच सेवा सुरू रहावी, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान शिबिरावेळी व्यक्त केली. विरुपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या शिबिरात 182 दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी (दि.2) शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उपाध्यक्ष अमित ओझे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोर्ईर, रुचिता लोंढे, वर्षा ठाकूर, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, अमोघ ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 182 जणांनी रक्तदान केले असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही शिबिरात रक्तदान केले.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply