Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून गुळसुंदेत सामाजिक सभागृह

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून 40 लाख 55 हजार रुपये खर्चून गुळसुंदे येथे सामाजिक सभागृह उभारण्यात आले. त्याचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले.
गुळसुंदे येथील सामाजिक सभागृहाची दूरवस्था झाली होती. त्यामुळे येथील तरुणांनी नवीन वास्तू उभारण्यासाठी निधीची मागणी आमदार महेश बालदी यांच्याकडे केली होती. आमदार महेश बालदी यांनी त्वरीत दोन मजली इमारत बांधण्याचे आश्वासन दिले. त्या अनुषंगाने 40 लाख 55 हजार रुपयांचा निधी खर्चून दोन मजली इमारत, त्यामध्ये तळ मजल्यावर मोठे सभागृह, पहिल्या मजल्यावर दोन खोली तसेच आणखी एक सभागृह आणि त्यानंतर टेरेस व त्यावर पत्र्याची शेड अशाप्रकारे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आले असून आमदार महेश बालदी यांनी वचनपूर्ती केली. त्याबद्दल येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश बालदी यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांना धन्यवाद देण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे गुळसुंदे जि. प. विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, प्रवीण खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद विद्वांस, चिंतामण कडवे, शरद ठाकूर, सुनील पालकर, सरपंच मीनाक्षी जगताप, ग्रामपंचायत सदस्य सतिश साठे, सदस्या अपर्णा चौलकर, सदस्या आशा वीर, माजी सदस्या लता साठे, महादेव कांबळे, अनिल पाटील, संतोष चौलकर, संतोष साठे, मधुकर पाटील, राजा पाटील, अजिंक्य सुर्वे, प्रशांत पाटील, स्वप्निल चौलकर, वैभव भोईर, मनिष साठे, सचिन गायकवाड, आतिष भोईर, सचिन कोळंबेकर, दीपक पारंगे, गजानन वीर, संकेत चौलकर, अशोक मालुसरे, योगेश पालकर, सुजय बोनकर, प्रमिला साठे, वनिता शिर्के, ऋतुजा कडवे, नम्रता कडवे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply