पनवेल : रामप्रहर वृत्त
व्यक्तीगत हितापेक्षा आपल्या गावाचे हित हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे विकासकामांमध्ये सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) न्हावे येथे केले. या वेळी त्यांच्या हस्ते सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले.
उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे होत आहेत. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ओएनजीसी गेटपासून न्हावाखाडी मोठापाडापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हे काम सात कोटी 50 लाख 4 हजार 765 रुपयांच्या निधीमधून होणार आहे.
या कामाच्या भूमिपूजन समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, सदस्य सागर ठाकूर, वसंत पाटील, अरुण ठाकूर, सी.एल. ठाकूर, किशोर पाटील, साईचरण पाटील, सुहास भगत, माजी उपसरपंच रामदास ठाकूर, माजी सदस्य योगिता भगत, सुहास ठाकूर, शैलेश पाटील, नरेश मोकल, हेमंत ठाकूर, भार्गव ठाकूर, उषा देशमुख, सुजाता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …