Breaking News

ऑस्ट्रेलियाचे डग क्रोवेल यांची किमया 91व्या वर्षीही करताय फटकेबाजी

सिडनी ः वृत्तसंस्था

इच्छा असली की सर्व गोष्टी साध्य होतात, असे म्हटले जाते. याची प्रचिती एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूकडून आली. हा क्रिकेटपटू चक्क 91व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करतोय. डग क्रोवेल असे या क्रिकेटपटूचे नाव असून, ते या वयात खेळणार्‍या एका दुर्मीळ गटाचा भाग आहेत. त्यांनी मोठ्या स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले नाही, पण त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती व खेळाबद्दलची आवड त्यांना या वयातही क्रिकेटच्या मैदानात घेऊन आली.

ऑस्ट्रेलियामधील वेटरन्स क्रिकेट एक अशी स्पर्धा आहे, ज्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे खेळाडू भाग घेतात. ही स्पर्धात्मक लीग असून डग क्रोवेल 15 वर्षांपासून खेळत आहेत. क्रोवेल म्हणाले, 30व्या किंवा त्याहून अधिक वयात क्रिकेट सोडणार्‍यांसाठी ही लीग आहे. मला खेळायला आवडते व मी तंदुरुस्त राहतो. चेंडू आता बॅटवर तितका वेगवान येत नाही. आता चेंडू मारणे सोपे आहे. कारण चेंडू हळूहळू आपल्यापर्यंत पोहचतो. डग क्रोवेल यांच्याकडे तरुण वयात व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी जास्त संसाधने नव्हती. कारण त्यांच्याकडे लहान शेती असणार्‍या समुदायासाठी क्लब नव्हता, तसेच दुसर्‍या महायुद्धात इंधनाची कमतरता असल्याने त्यांना इतरत्र प्रवास करणे अशक्य होते. 1946मध्ये त्यांनी विंटन क्रिकेट क्लबची स्थापना केली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply