Breaking News

साजगाव येथील कारखान्यात वायूगळती; तीन कामगार रुग्णालयात

खोपोली : प्रतिनिधी
खालापुरातील साजगांव औद्योगिक वसाहतीतील युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेटमधील फिनोजल कंपनीत केमिकलमध्ये वायूगळतीमुळे तीन कामगार गुदमरल्याची घटना गुरूवारी (दि. 13)सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सहाय्यक पोलीस निरिक्षक हरेश काळसेकर, केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांच्या समवेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून एका कामगाराची परिस्थिती चिंताजनक असल्याने खारघर येथे हालविण्यात आले, तर दोन जण खोपोली जाखोटीया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगीक वसाहत असलेल्या साजगांव ग्रामपंचायत हाद्दीत युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेट येथे वाहनांसाठी आँईल तयार करणारी फिनोजल कंपनी आहे. या कंपनीतील एका प्लँटमध्ये गुरूवारी कामगार केमिकलमध्ये पावडर टाकत असताना जास्त प्रमाणात पावडर पडल्यामुळे रिअ‍ॅक्टरमधून पावडर प्लँटमध्ये पसरल्याने तीन कामगार गुदमरले होते. प्रशांत धाडवे (वय 25) याची परिस्थिती गंभीर असल्याने खारघर येथे हालविण्यात आले, तर सिद्धेश मल्हार (वय 20), राम सिंग (वय 21) यांच्यावर खोपोलीतील जाखोटीया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाचे जवान मोहन मोरे व त्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारखान्यात आगीची घटना घडू नये यासाठी पाण्याचे बंब तयार ठेवले, तर जखमी कामगार व कारखान्यातील कामगारांना मदत केली. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार सुधाकर राठोड,सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर घटनास्थळी पोहचले त्यानंतर केमिकल एक्सपर्ट धनजंय गिध यांना बोलविण्यात आले. केमिकल एक्स्पर्ट धनंजय गिध यांनी घटनास्थळी खात्री करून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

Check Also

‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले

बिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपट पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह …

Leave a Reply