खारघर : रामप्रहर वृत्त
महायुतीचे सरकार ताकदीने काम करतंय. याच पद्धतीने हेच सरकार पुढील काळातदेखील काम करत राहावे यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे. याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेल विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून खारघर सेक्टर 5मधील खारघरचा राजा हॉलमध्ये कार्यक्रम झाला. या सोहळ्यास महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, विस्तारक सागर मोरे, खारघर प्रभारी राजेश गायकर, जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, कीर्ती नवघरे, महिला मोर्चा उत्तर रायगड सरचिटणीस संध्या शारबिद्रे, भाजप खारघर शहर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, अनिता पाटील, नेत्रा पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, उपाध्यक्ष रमेश खडकर, संजय घरत, अमर उपाध्याय, शैलेंद्र त्रिपाठी, महिला मोर्चा सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजिका बिना गोगरी, सहसंयोजिका श्यामला सुरेश, उत्तर रायगड सहसंयोजिका स्नेहल बोधाई, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस भाग्यश्री खरपूरीया, महिला मोर्चा उपाध्यक्ष मधुमिता जेना, सारिका जाधव, अंकिता वारंग, मंडल चिटणीस अनिता जाधव, शोभा मिश्रा, निलम विसपुते, चिटणीस मीनाक्षी अंथवाल, दुर्गादेवी, सीमा खडसे, सोशल मीडिया संयोजिका मंगल घोलप, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका प्रिया दळवी, राजस्थान सेल संयोजिका सुशीला शर्मा, प्रभाग अध्यक्ष सोनल लाहा, सीमा खडकर, नेहा यादव, वॉर्ड उपाध्यक्ष जुमा चक्रवर्ती, गायत्री महापात्रा, सोमा विश्वास, माया सिंग, गायत्री दुबे, सीमा मजुमदार, मनीषा तळवडकर, नंदा पानसरे, कावेरी डोळस, नूतन डांगळे, सुनीता देशमुख, ममता आचरेकर, चिटणीस नूतन सिंग, विद्या येवले, शोभा लवटे, संध्या पटेल, निर्मला यादव, सुशीला शर्मा, धनश्री भोईर, स्मिता आचार्य,
सरचिटणीस अक्षय लोखंडे, उपाध्यक्ष प्रवीण बेरा, सचिव आदित्य हातगे, दीपक ठाकूर, यश पवार, हार्दिक पटेल, प्रथम पाटील, सार्थक दोरुगडे, ध्रुव गजरा, सुनील कटके, रोशन रॉय, किरण रावडे, बंटी ढाकसे आदी पदाधिकारी, कायकर्ते उपस्थित होते.
या वेळी केतकी पुरकर यांनी पैठणी जिंकण्याचा मान पटकावला. त्यांना तसेच लकी ड्रॉमधील विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …