मुरुड : प्रतिनिधी
सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्च करून मुरुडमधील वैकुंठ स्मशानभूमीत सोयी सुविधा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली
निसर्गरम्य परिसरात वैकुंठ स्मशानभूमी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात या स्मशानभूमीचा विकास झाला नव्हता. नगर परिषदेने सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्चून स्मशानभूमीत पिंडदान शेड, प्रवेशद्वार, लाकडांची वखार, पाण्याची टाकी, पेव्हर ब्लॉक व लोकांसाठी बसण्यासाठी शेड अशी कामे करण्यात आली आहेत.