Breaking News

हमरापुर येथे गोडाऊनला आग

पेण : प्रतिनिधी

तालुक्यांतील हमरापूर फाटा पोल्ट्री फार्मजवळ एका गोडाऊनला बुधवारी (दि. 11) दुपारी आग लागून, त्यात  गणपती मुर्ती बनविण्याचे साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हमरापूर पोल्ट्री फार्मजवळ निळकंठ नाचम यांचे गोडाऊन असून त्यात फायबरच्या मुर्ती, प्लास्टर, काथ्या, रबर व इतर साहित्य ठेवले होते. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सदर गोडाऊनला अचानक आग आगली. आग वाढतच जाऊन धुराचे लोट हमरापूर पंचक्रोशीत पसरले. आगीची खबर मिळताच पेण नगरपरिषद व जेएसडब्ल्यू कंपनीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात  करण्यात आली आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply