कळंबोली : बातमीदार
विधानसभेच्या रणधुमाळीत महायुतीचे पनवेल विधानसभा क्षेत्रातील दमदार उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पत्नी अर्चना ठाकूर याही रणांगणामध्ये उतरल्या आहेत. त्यांच्या झंझावाती प्रचाराला कळंबोली वसाहतीसह अन्य भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कळंबोलीतील गुरुविला सोसायटीमध्ये झालेल्या प्रचार रॅलीत नागरिकांनी त्यांचे फटाक्याच्या आतषबाजीत भव्य स्वागत करून पुन्हा एकच वादा फिरसे प्रशांतदादाचा नारा मतदारांनी दिला आहे.
विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहचत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी आता वर्षा ठाकूर व अर्चना ठाकूर याही प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सहभागी झाल्या आहेत. वर्षा ठाकूर स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत असून कळंबोलीतील विविध हौसिंग सोसायटीमधून प्रचार करून पुन्हा प्रशांत ठाकूर यांना शंभर टक्के मतदान करून आमदार करण्यासाठी आवाहन करत आहेत. सोमवारी सायंकाळी झालेल्या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने मतदारांनी सहभाग घेतला.
या वेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रिया मुकादम, सोसायटीचे अध्यक्ष जगदीश पाटील, सचिव उमाकांत गव्हाणे तसेच सदस्य गहिनीनाथ धुमाळ, अशोक भोसले आदींसह सोसायटीतील सदस्य सहभागी झाले होते.
या वेळी वर्षा ठाकूर यांनी, मी निश्चितच सोसायटी व कळंबोली वसाहतीमधील नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून कळंबोलीच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …