Breaking News

पनवेलमध्ये बॅडमिंटन स्पर्धेला प्रतिसाद

परेश ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील कारावली स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रथमच पनवेल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात रविवारी (दि. 16) झाली 15 आणि 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रायगड बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला.
बॅडमिंटन स्पर्धेतील 15 वर्षाखालील मुलांच्या गटात नीव चंदे याने प्रथम, मुकेश यादवारने द्वितीय, मुलींच्या गटात आर्या गावडेने प्रथम, त्वरिता वॉरियरने द्वितीय, 19 वर्षाखालील गटात नीव चंदेने प्रथम, दिवेयान जेठवाने द्वितीय, मुलींच्या गटात अन्नू कुमारीने प्रथम व अंजू यल्लाने द्वितीय क्रमांक पटकाविला. या सर्व विजेत्यांचा रायगड बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
बक्षीस वितरण समारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महाबाला शेट्टी, डॉ. दीपक पुरोहित, डॉ. मिलिंद घरत, वरप्रसाद राव, सरचिटणीस अमरिश मोकल, के. टी. शेट्टी, योगेश पाटील, विकास पाटील, रथना चौता, राजेश्वरी उन्निकत, सुदीप चौता, सरचिटणीस स्नेहल पाटील, नागराज पाल, सचिव सुनंदा सप्लिगं, नेहा पाल, प्रसाद डला, श्रीशैला भंडारी यांच्यासह पदधिकारी, स्पर्धक उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply