Breaking News

खोपोली बसची वेळ बदला -भाजपची मागणी; एसी बससाठीही आग्रह

खोपोली ः प्रतिनिधी

खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी तसेच कामानिमित्त नोकरदार, अधिकारीवर्गाच्या सोयीसाठी खोपोली भाजपने पुढाकार घेतला आहे. नवी मुंबई येथील सकाळची पहिली बस 6 वा. तसेच दुपारदरम्यान एसी बस सुरू करण्याचे निवेदन पत्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी व शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडे दिले आहे. नवी मुंबई महानगर परिसरात खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी महाविद्यालयात तसेच कामानिमित्त नोकरदार, अधिकारीवर्ग दररोज सकाळी जातात. नवी मुंबई महापालिकेची पहिली बस 7.20 वाजता असल्याने पुढे पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे पहिली बस सकाळी 6 वाजता सुरू केल्यास सर्व जण वेळेत पोहचून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही. यासाठी भाजपने हे निवेदन दिले आहे. पनवेल, नवी मुंबई महानगरात मेडिकल, अभियांत्रिकी, विविध शाखांची कॉलेजेस, हॉस्पिटल तसेच कामानिमित्त महिला, नोकरदार जात आहेत. नवी मुंबईची बससेवा सुरू झाल्यामुळे रोजचा प्रवास करणे सोपे झाले आहे. वाशी खोपोली पहिली बस 7.20 वाजल्यापासून सुरू होत असल्यामुळे पुढे पोहचताना उशीर होतो.त्यामुळे विद्यार्थी, नोकरदारांना सकाळी 8 वाजण्याच्या आत पोहचण्यासाठी खासगी वाहनांनी जावे लागते. यादरम्यान आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन भाजपचे शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्याकडे निवेदनपत्र देत समस्यांचा पाढा वाचला. विद्यार्थी आणि नोकरदार महिलांना सकाळी होणारा नाहक त्रास टाळण्यासाठी पहिली बस 6 वाजता सुरू करा, तसेच उन्हाळ्यात प्रवाशांसाठी एसी बस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई नगरपालिकेने खोपोलीत बससेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण दूर झाली असून सकाळी 6 वाजताची बस आणि दुपारच्या वेळेत एसी बससेवा सुरू करण्याचे निवेदनपत्र आमदार गणेश नाईक यांच्याकडे दिले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हेदेखील यासाठी पाठपुरावा करीत असल्याची माहिती सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply