आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक पूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीने गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान झाली आहे. या मार्केटच्या राजाचे पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत जनतेच्या सुख, समृद्धी आणि शांतीचा मार्ग सुलभ व्हावा, अशी प्रार्थना केली.
या गौरा गणेशोत्सवाचे यंदाचे 32वे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. या वेळी महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना गौरा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक, सचिव दिलीप अनभुले, इतर पदाधिकारी, सदस्य आणि भाविक उपस्थित होते.