Breaking News

उरण रेल्वे सीएसएमटी, बोरीवलीपर्यंत जोडणार -रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण रेल्वे भविष्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि बोरीवलीपर्यंत जोडली जाईल. मुंबईसह उरणच्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी आगामी काळात अधिक वेगाने वाढेल यासाठी आमदार महेश बालदी प्रयत्न करीत आहेत. उरणच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यामुळे त्यांना जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.
उरण विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 17) उरण येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व मुंबईमध्ये रेल्वे मोठी गुंतवणूक करीत आहे. महाराष्ट्रात एक लाख 64 हजार कोटी रुपये खर्चून रेल्वेची गुंतवणूक होत आहे. मुंबईमध्ये 16 हजार 240 कोटींची गुंतवणूक होत आहे. यामुळे रेल्वेची क्षमता अधिक पटीने वाढणार असल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले.
उरण शहरात तत्कालीन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून उरण शहरात पाईपलाईनने गॅसपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित केली. त्यानंतर संपूर्ण तालुक्यात पाईपने गॅसपुरवठा करणारी वाहिनी साकारण्यात येईल, असे अभिवाचन देऊन आमदार महेश बालदी म्हणाले की, उरणमध्ये रेल्वेसेवा सुरू केली. आता येथून मुंबई, ठाणे, बोरीवली व इतर ठिकाणी थेट रेल्वेगाडी सुरू व्हावी यासाठी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल. दुर्बल घटकांसाठी पक्क्या घरांची योजना कार्यान्वित करणार आहे. नवी मुंबई विमानतळामध्ये स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांनाच घेतले जाईल. जनतेची विकासकामे करणे हाच आमचा मसुदा असून आम्ही विकासात राजकारण करीत नाही. विरोधी दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने मागे राहतील आणि विजयाचा गुलाल आपल्याच डोक्यावर पडेल.
या प्रचार सभेला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, मेघनाथ तांडेल, शिवसना तालुका प्रमुख महेंद्र पाटील, संजय गायकवाड आदींनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत यांनी केले.
या वेळी उरण मतदारसंघातील कार्यकर्त्या महिलांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. या सभेला माजी जि.प. सदस्य विजय भोईर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, महालण अध्यक्ष महेश कडू, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, कामगार नेते सुरेश पाटील, भूपेंद्र घरत, राजेश ठाकूर, सुनील पेडणेकर, राजेंद्र खारपाटील, हितेश शाह, मनन पटेल, दिनेश ठक्कर, हस्तीमल मेहता, अजित भिंडे, मनोहर सहतिया, निलेश कदम, मदन कोळी, राजेश कोळी, रवी कुलकर्णी, महेश घरत, शशी पाटील, मुकुंद गावंड, जीवन गावंड, धनाजी ठाकूर, समिता दत्ता ठाकूर, भार्गव पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष संगीता पाटील, भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजिता पाटील, बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, रजनी कोळी, सुषमा म्हात्रे, निर्मला घरत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply