पनवेल : रामप्रहर वृत्त
शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेस शनिवारी (दि. 30) दुसर्या दिवशीही रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या दुसर्या दिवशी वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाइट लाइट, ठाणे), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), जाळ्यातील खिळे (बोलपट, पुणे), गुंतता (निर्मिती, वसई), घरोट (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई), दुसरा आइन्स्टाइन (सौ. नलिनी यशवंत दोडे विद्यालय, मुलुंड), 12 कि. मी. (ए. एस. एम. प्रोडक्शन, मुंबई) या नऊ एकांकिकांचे सादरीकरण होते.
स्पर्धेच्या तिसर्या व अंतिम दिवशी रविवारी आर ओके (सीकेटी कॉलेज, पनवेल), भाद्रपद (कलारंग सामाजिक संस्था, अलिबाग), शुद्धता गॅरेंटेड अर्थात पाणी (मॉर्निंग ड्रीम एंटरटेनमेंट, मुंबई), बेड टाइम (रूद्र प्रोडक्शन, इचलकरंजी), कुणीतरी पहिलं हवं (बी. एम. सी. सी., पुणे), बिनविरोध (रंगपंढरी, पुणे) या सहा एकांकिका सादर होणार आहेत.
स्पर्धेच्या दुसर्या दिवशीही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकांकिका, कलाकार व त्यांच्या टीमच्या सादरीकरणाला दाद देऊन त्यांची स्फूर्ती वाढवली. या वेळी रंगकर्मी, कलाकार, प्रेक्षकांनी स्पर्धेच्या उत्तम व नीटनेटक्या नियोजनाबद्दल आयोजकांचे तोंडभरून कौतुकही केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …