नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. आता याबाबतची सुनावणी 14 फेब्रुवारीला होईल, अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष सर्वाच्च न्यायालयात पोहचला आहे. सत्तासंघर्षात मंगळवारी (दि. 10) काही निकाल येणार की फक्त घटनापीठ बदलले जाणार याची उत्सुकता होती, पण सुनावणी झाली नाही. आता ही सुनावणी 14 फेब्रुवारीपासून सलग घेतली जाणार आहे.
Check Also
माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास
ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …