लंडन : वृत्तसंस्था
पाकिस्तान सुपर लीग (पीसीएल)मध्ये खेळाडूंना लाच दिल्याप्रकरणी पाकचा माजी क्रिकेटपटू नासीर जमशेदला 17 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. नासीरला पीसीएलमध्ये सामना निश्चिती (मॅच फिक्सिंग) करायची होती.
नासीरला इंग्लंडमधील मॅनचेस्टर क्राऊन कोर्टाने 17 महिन्यांची शिक्षा सुनावली. याआधी 2018मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नासीरवर 10 वर्षांची बंदी घातली होती.
नासीरसह युसूफ अन्वर व मोहम्मद इजाझ यांनाही शिक्षा सुनावण्यात आली. युसूफला 40, तर इझाझला 30 महिन्यांची शिक्षा झाली. दोघेही ब्रिटिश नागरिक आहेत. तिघांनीही त्यांच्यावरील
आरोप मान्य केलेत.
नासीरने पाकच्या संघाकडून 48 वन डे, दोन कसोटी व 18 टी-20 सामने खेळलेत. पीसीएलमधील इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध पेशावर झाल्मी यांच्यातील सामन्यात खेळाडूंनी खराब कामगिरी करावी यासाठी नासीरने प्रयत्न केले होते.
नासीरने पाक सुपर लीगसह 2016मध्ये बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत फिक्सिंग केल्याचे समोर आले. नासीरला एका सामन्यात दोन षटके निर्धाव खेळायचे होते, पण नंतर त्याने नकार दिला. त्याने शर्जील खान याला इस्लामाबादविरुद्धच्या सामन्यातील दुसर्या षटकात दोन चेंडू निर्धाव खेळण्यास सांगितले होते. या प्रकरणी पाक बोर्डाने शर्जीवर पाच वर्षांची बंदी घातली आहे.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper