Breaking News

अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली मने!

मुंबई : प्रतिनिधी

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परलेला भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे गुरुवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी त्याने कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास नकार देऊन चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत.

कर्णधार अजिंक्य रहाणेचे माटुंगा येथील राहत्या घरी अधिक जल्लोषात तसेच पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात स्वागत झाले. रहाणेच्या स्वागतासाठी सोसायटीमधील काही लोकांनी केक आणला होता. त्यावर कांगारूची प्रतिकृती होती, मात्र रहाणेने आपल्यातील खिलाडूवृत्ती दाखवून ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या कांगारूचा केक कापण्यास नकार दिला. मैदाबाहेरील रहाणेने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे दर्शन पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. काहींनी तर रहाणेचे कौतुक करताना ‘एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे’ असे म्हटले आहे.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply