पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 13) व रविवारी (दि. 14) पनवेलमध्ये डॉक्टरांचे क्रिकेट सामने रंगणार आहेत. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे थोडासा विरंगुळा म्हणून ह्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने शनिवारी रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांची रायगड डॉक्टर्स प्रीमियर लीग तसेच महिला डॉक्टरांसाठी बॅडमिंटन स्पर्धा आणि रविवारी पनवेल परिसरातील डॉक्टरांची पनवेल डॉक्टर्स प्रीमियर लीग आणि महिला डॉक्टरांची बॉक्स क्रिकेट लीग होणार असल्याची माहिती पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल यांनी दिली.
दोन्ही स्पर्धा पनवेलमधील सिडको मैदान, पिल्लई कॉलेज, नवीन पनवेलमध्ये होणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांचे आठ संघ शनिवारी खेळतील. त्याच दिवशी महिला डॉक्टरांच्या बॅडमिंटन स्पर्धा होतील. रविवारी पनवेल परिसरातील डॉक्टरांचे आठ संघ खेळतील आणि महिला डॉक्टरांचे सहा संघ बॉक्स क्रिकेट खेळतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मेहनत घेत आहेत.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार
संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper