Breaking News

मयूर शेळके, अश्विन डिचोलकर समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासात्मक धोरण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत नवीन पनवेलमधील प्रसिद्ध चिंतामणी मित्र मंडळाचे अध्यक्ष मयूर शेळके आणि उपाध्यक्ष अश्विन डिचोलकर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.
या कार्यक्रमास उरण मतदारसंघाचे आमदार व पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, माजी नगरसेवक समीर ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, सरचिटणीस रूपेश नागवेकर, ज्येष्ठ नेते अशोक शेळके उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल परिसरात झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते भाजपच्या विचारधारेकडे आकर्षित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मयूर शेळके आणि अश्विन डिचोलकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त कार्यकर्त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. चिंतामणी मित्र मंडळाचा मोठा जनसंपर्क आणि तरुण कार्यकर्त्यांचे जाळे भाजपसाठी जमेची बाजू ठरणार आहे. या पक्षप्रवेशामुळे नवीन पनवेल परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढली आहे.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply