Breaking News

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार

श्रीनगर : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर अहमद खान याला सुरक्षा दलाच्या जवानांनी त्रालमधील चकमकीत ठार केले. याबाबत काश्मीरचे आयजी एस. पी. पानी यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकार परिषदेत माहिती दिली. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये रविवारी रात्री चकमक झाली. त्यात जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर मुदस्सिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाईचाही समावेश आहे. मुद्दस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता, असे बोलले जाते. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या 23 वर्षीय मुदस्सिरने आयटीआयमधून इलेक्ट्रिशनचा एक वर्षाचा डिप्लोमा केला होता. पुलवामा हल्ल्यात ज्या वाहनाचा वापर झाला होता, ते वाहन आणि स्फोटकांची व्यवस्था मुदस्सिरनेच केली होती.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अतिरेक्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर आतापर्यंत 18 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे सहा दहशतवादी आहेत, असे लष्कराकडून सांगण्यात आले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply