खारघर : रामप्रहर वृत्त
दोन युवकांकडून हेल्मेटने झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेले शिवकुमार शर्मा यांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजाद्वारे रविवारी (दि. 9) खारघर पोलीस ठाण्यासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेला आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. स्व. शर्मा यांच्या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
वाशी येथील रहिवासी शिवकुमार शर्मा यांना 2 फेबु्रवारी रोजी खारघरमधील उत्सव चौक येथे दोन युवकांकडून हेल्मेटच्या सहाय्याने जबर मारहाण करण्यात आली होती. डोक्यात हेल्मेटने वारंवार प्रहार केल्याने शर्मा यांचा मृत्यू झाला. दोन्ही आरोपी खारघर येथे आयोजित इज्तेमा कार्यक्रमावरून आले असल्याचे सांगितले जात आहे. या धक्कादायक व संतापजनक घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वात सकल हिंदू समाज रविवारी खारघर पोलीस ठाण्यासमोर एकवटला होता. या वेळी स्व. शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या श्रद्धांजली सभेला विश्व हिंदू परिषदेचे प्रमोद प्रसन्ना, स्वरूप पाटील, कृष्णा बांदेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमोद पांडे, हिंदू जागरण मंचचे दत्तात्रेय शिंदे, शिवम सिंग, ललित चौधरी, जागृत फाउंडेशनचे ज्ञानेश्वर खरपुरिया, भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्याय किरण पाटील, माजी नगरसेवक संतोष शर्मा, संध्या शारबिंद्रे, बिना गोगरी, साधना पवार, शैलेंद्र त्रिपाठी, झूमा चक्रवर्ती, गायत्री खडवडकर, शर्मा कुटुंबियांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, नागरिक मोठ्या संख्येेने उपस्थित होते.
स्व. शिवकुमार शर्मा यांच्या आरोपींना अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी तसेच या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी आदी मागण्या या वेळी पोलिसांकडे करण्यात आल्या.
Check Also
नमो चषक कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम-ए-हिंद लाली गुरुदास पोल किताब विजेता
महाराष्ट्र चॅम्पियन अमेघा घरतची लक्षणीय कामगिरी पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील …