पनवेल : रामप्रहर वृत्त
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2025 क्रीडा महोत्सव अंतर्गत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एसएसएफए बी संघाचे विजेतेपद पटकाविले.
कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेला लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर व माजी नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या हस्ते झाले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अजय बहिरा, भाऊ भगत, रवी गोवारी, महिला मोर्चाच्या कामोठे अध्यक्ष वनिता पाटील, भाजपचे शहर सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, मनोहर शिंगाडे, साधना आचार्य तसेच स्पर्धा समन्वयक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी, सचिव शुभ पाटील, सदस्य आशिष कडू, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. एसएसएफए बी संघाने 420 या संघावर मात करून नमो फुटबॉल चषक जिंकला, तर एसबीएससी संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला 20 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 10 हजार रुपये, तृतीय क्रमांकाला 5 हजार रुपये आणि सर्व विजेत्या संघांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उत्तम नियोजन या ठिकाणी होते. भव्य स्वरूपात झालेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले. त्यामुळे खेळाडूंनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.
Check Also
नमो चषक कुस्त्यांच्या दंगलीत रुस्तम-ए-हिंद लाली गुरुदास पोल किताब विजेता
महाराष्ट्र चॅम्पियन अमेघा घरतची लक्षणीय कामगिरी पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील …