पतियाळा ः वृत्तसंस्था
भारताचा गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग तूर इंडियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात नव्या राष्ट्रीय विक्रमासह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. याचप्रमाणे 4 बाय 100 मीटर रिलेमधील भारताच्या ‘अ’ महिला संघाने आणि द्युती चंदने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
ताजिंदरने 21.49 मीटर अंतरावर गोळा फेकून ऑलिम्पिक पात्रतेच्या (21.10 मीटर) निकषांची पूर्तता केली. त्याने 2019मधील स्वत:चा 20.92 मीटरचा विक्रम मोडीत काढला.
हिमा दास, द्युती चंद, एस. धनलक्ष्मी आणि अर्चना सुशींद्रन यांचा समावेश असलेल्या महिला रिले संघाने 43.37 सेकंद अशी वेळ नोंदवली, मात्र ऑलिम्पिक पात्रता गाठण्यात त्यांना अपयश आले. भारताच्या ‘ब’ संघाने 48.02 सेकंद वेळ नोंदवली. द्युतीने 100 मीटर शर्यत 11.17 सेकंद वेळेसह जिंकली, मात्र तिची ऑलिम्पिक पात्रतेची संधी (11.15 सेकंद) हुकली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …