Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या अभिनेत्री स्वेतलाना यांना शुभेच्छा

पनवेल : प्रतिनिधी

सोनाई फिल्म क्रिएशनच्या मराठी ‘मजनू’ चित्रपटातील अभिनेत्री स्वेतलानाने शनिवारी (दि. 25) लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी तिचे कौतुक करून तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.

नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा पे्रक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या ‘मजनू’ या चित्रपटाद्वारे नवीन पनवेलमधील स्वेतलाना अहिरे ही नायिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ‘मजनू’ हे ग्रामीण बाज असलेले निमशहरी भागातील कथानक असून हळूवार फुलणार्‍या प्रेमकथेसोबत प्रेक्षकांना उत्कंठावर्धक  सस्पेन्स यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात स्वेतलाना  सोबत ‘लागीर झालं जी’फेम अभिनेता नितीश चव्हाण, रोहन पाटील, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर व भाकी चव्हाण यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची नायिका स्वेतलाना अहिरे ही नवीन पनवेलमधील आहे. शनिवारी तिने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आपले वडील दिलीप अहिरे यांच्यासोबत भेट घेतली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तिच्या चित्रपटातील  भूमिकेबद्दल तिच्याकडून जाणून घेतले. पनवेलमधील तरुणीला चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली, या  यशाबद्दल तिचे कौतुक करून तिच्या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. या वेळी वादळवाराचे संपादक विजय कडू उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply