Breaking News

पूर परिस्थितीतील योजनाबाबत चर्चा

उरण : वार्ताहर

दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडत आहे त्यामुळे रानसई धरण ओव्हर फ्लो झाले आहे. हे धरण पुर्णता भरल्यानंतर त्याचे पाणी सोडल्यावर व अतिवृष्टीमुळे कंठवली, विन्धानेव, बोरखार, चिरनेर, दिघोडे या गावातील घरान्माध्ये पाणी जाऊन पूर येऊन आपत्कालीन परिस्थती निर्माण होऊ शकते. त्या अनुशंगाने मंगळवार (दि. 12) उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत विंधणे चिरनेर, दिघोडे गावाचे सरपंच,  ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठितयांच्या विंधणे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन उपस्थितांना पुर परिस्थिती निर्माण झाल्यास, करावयाच्या उपाय योजना सांगण्यात आल्या. शासकिय यंत्रणाशी संपर्क साधणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या.

या बैठकीसाठी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोनि (गुन्हे) सुहास चव्हाण, रानसई धरणाचे एमआयडीसी असिस्टंट इंजिनिअरचे जालिंदर कुंभार, उपअभियंता रवींद्र चौधरी, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, जासई मंडळ अधिकारी एम. सी. जोशी, चिरनेर तलाठी के. डी. मोहिते, ग्रामसेवक आर. बी. गावंड आदी उपस्थित होते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply