Breaking News

कोप्रोलीतील पाच दुकाने चोरट्यांनी फोडली

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील कोप्रोली नाक्यावर अज्ञात चोरट्यांनी मेडिकल स्टोअर्ससह चार दुकानांचे शटर तोडून 31 हजार रुपयांची रोकड चोरून ते पसार झाल्याची घटना घडली  आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान कोप्रोली नाका येथील श्री. मेडिकल व दुसर्‍या बाजूला असलेले भरकदेवी आईस्क्रीम सेंटर, माया कलेक्शन, रेडिमेंट गारमेंट आणि स्युज सेंटर आणि धनश्री बियर शॉप या चार दुकानांचे शटर तोडून आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही कमेरे दुसर्‍या बाजूला फिरवून दुकानांच्या आत प्रवेश केला आणि गल्ल्यांतून 31 हजार रुपयाची रोकड चोरून नेली. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यातील प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक निरीक्षक निलेश तांबे, गणेश कराड यांचे पथक अधिक तपास करीत आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply