Breaking News

रवीशेठ पाटील यांनी राष्ट्रवादीला फोडला घाम

पेण : प्रतिनिधी

माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करून रायगडची राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाने शेकाप, राष्ट्रवादीला घाम फुटला असून, तटकरेंना आतापासूनच लोकसभा निवडणुकीत आता आपले काय होणार? या गोष्टीची धास्ती वाटू लागली आहे.

रायगडमधील काँग्रेसचे ज्येश्ठ नेते, मात्री मंत्री रवीशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित वर्शा निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेष करून एक चांगला निर्णय घेतला आहे. माजी मंत्री रवीशेठ पाटील हे रायगडातील काँग्रेसचे बडे नेते म्हणून ओळखले जात होते. जिल्हयात काँग्रेस वाढावी यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. त्यासाठी त्यांनी रायगडातील प्रस्थापित असलेल्या शेकापसमवेत सातत्याने संघर्शही केला, पण त्याच शेकापसमवेत महाआघाडी करण्याचा निर्णय प्रदेष कॉग्रेस नेतृत्वाने घेऊन रवीशेठ पाटील यांचे राजकीय खच्चीकरणच करण्याचा प्रयत्न केला. रवीशेठ यांना शह देण्यासाठी पेण तालुका काँग्रेस कमिटीच बरखास्त करून टाकली. त्यामुळे संतापलेल्या रवीशेठ पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वाला धडा शिकविण्यासाठी भाजपत प्रवेश करून रायडचे राजकीय समीकरणच बदलून टाकले आहे.

रवीशेठ पाटील यांच्यासारखा मातब्बर, जनाधार असलेला नेता पक्षात आल्याने आता रायगडात भाजपचे प्राबल्य वाढले असून, त्याचा राजकीय फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना होणार अशी राजकीय चिन्हे दिसू लागली आहेत. कारण आतापर्यंत काँग्रेसला गृहित धरून चाललेल्या राष्ट्रवादीला या राजकीय घडमोडीमुळे शह बसला आहे. दिल्लीत खासदार म्हणून जाण्याची तयारी केलेल्या तटकरेंची राजधारी एक्स्प्रेस या वेळीही हुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण याच तटकरेंनी रवीशेठ पाटील यानांच असेच पराभूत करून आपला राजकीय स्वार्थ साधला होता. त्याचे उट्टे काढण्याची संधी रवीशेठ पाटील यांना मिळाली आहे.

रवीशेठ यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. कारण योग्य वेळी दिशा बदलली की आपोआपच यशाचा मार्ग सापडतो हे अनेक उदाहरणावरून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे रवीशेठ पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चितच फलदायी ठरणार आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा दणदणीत विजय संपादित करून परत एकदा देषाची आणि राज्याची सत्ता मिळविण्याचा निर्धार भाजप नेतृत्वाने केला आहे रायगडात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशठ ठाकूर यांच्या मार्गदर्षनाखाली जिल्हाध्यक्ष आमदार प्रषांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड जोरात सुरू आहे. त्यांच्या फौजेसह माजी मंत्री रवीशेठ पाटील भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे रायगडात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. याचा धसका शकाप, राश्ट्रवादीने घेतला आहे व यामुळेच युतीचे उमेदवार अनंत गीते यांना माजी मंत्री रवीशेठ पाटील यांचा मतांच्या रूपात नक्कीच फायदा होईल असे दिसते.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply