Breaking News

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत कामोठे येथे झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद डिस्टन्स इलेव्हन या संघाने पटकावले.
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शनिवारी कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पुरुष खुला गटाची व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर व नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेचे उद्घाटन कामोठे भाजपचे अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी कामोठे पोस्ट ऑफिस अधिकारी बबन भोईर, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, विकास घरत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व स्पर्धा समन्वयक मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, अक्षय सिंग, जय पावणेकर, भीमराव पोवार, भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामखडे, साधना आचार्य, अनुसूचित मोर्चाचे कामोठे अध्यक्ष मयुर मोहिते, अनुसूचित महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली खरटमोल, युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक, देवांशू प्रभाळे, आयुष किंद्रे, यश भोईर, कामोठे युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रवीण कोरडे, उपाध्यक्ष सागर ठाकरे, चिटणीस किरण जाधव, विकी टेकवडे, कोषाध्यक्ष अमोल बिनवडे, अमित गोडसे, सुयोग वाफारे, प्रथमेश सातपुते, निलेश सरगर, आकाश शिंदे, शंकर कारंडे, सुयश कांबळे, मयुर शिंदे, प्रणिल पवार, आकाश सिंग, आयुष कातोरे, नयन चौगुले, पार्थ लाले, रितेश कानोजिया, ओम पाटील, करन जगदाळे, प्रज्वल यांच्यासह इतर कार्यकर्ते व क्रीडारसिक उपस्थित होते.
उपविजेतेपद केवायसी इलेव्हन, तृतीय क्रमांक आयांश इलेव्हन, तर चतुर्थ क्रमांक संघ इलेव्हन संघाने प्राप्त केले. विजेत्या संघाला 15 हजार रुपये व चषक, द्वितीय 10 हजार रुपये व चषक, तृतीय पाच हजार रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

भाजप सदस्य नोंदणी मोहिमेला गती द्या -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक पनवेल …

Leave a Reply