Breaking News

माणगावात जुगार अड्ड्यावर छापा; 39 जणांविरुद्ध गुन्हा

माणगाव : प्रतिनिधी
माणगाव शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून 39 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणाहून एक लाख 85 हजार 310 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
माणगाव शहरातील वक्रतुंड हॉटेलमध्ये काही लोक तीन पत्यावर पैसे लावून गैरकायदेशीररित्या जुगार खेळत होते. या ठिकाणी पोलिसांनी शनिवारी (दि. 5) रात्री 8च्या सुमारास छापा टाकला. या प्रकरणी 39 जुगारींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 अन्वये गुन्ह्याची करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply