Breaking News

जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप

मुरूड : प्रतिनिधी

ऐतिहासिक मुरूड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातून  पर्यटक येत असतात. मात्र पुरातत्व खात्यांने कोणतीही पुर्वसूचना अथवा लेखी पत्र न देता रविवारी (दि. 26) किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला अचानक कुलूप लावल्याने हजारो पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले.

काही महिन्यापुर्वीच पुरातत्व खात्याने जंजिरा किल्ल्याला नवीन मोठे लोखंडी प्रवेशद्वार बसविले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने मुरुडला आले होते. मात्र बोट व्यवसायिक अथवा पर्यटकांना कोणतीही पूर्व सूचना न देता पुरातत्व खात्याने अचानक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने बोटधारक व पर्यटकांचा हिरमोड झाला. त्यांनी पुरातत्व खात्याच्या या कारभारबद्दल नाराजी व्यक्त केली.

किल्ल्याला कुलूप लावण्यागोदर किमान सर्वाना अथवा वर्तमानपत्रात तरी बातमी प्रसिद्ध करणे अनिवार्य होते. मे महिन्याच्या सुट्ट्यामध्ये पर्यटक मोठ्या हौशेने जंजिरा किल्ला पहावयास येतात. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पुरातत्व खात्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला अचानक कुलुप लावले. त्यामुळे पर्यटक नाराज झाले असल्याचे निवेदन किल्ल्यावर बोट वाहतूक करणार्‍या जंजिरा जल वाहतूक संस्थेने मुरुड तहसीलदार व पोलीस ठाण्यात दिले. यावेळी संस्थेचे चेअरमन इस्माईल आदमने, व्यवस्थापक नाझीम कादरी, तबरेज कारभारी, शाहनवाज डॉक्टर, अखलाक आदमने, रिजवान कारभारी उपस्थित होते.

दरम्यान, किल्ल्याला कुलूप लावणार्‍या पुरातत्व खात्याच्या कर्मचार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जंजिरा किल्ल्यास कुलूप लावल्याची घटना या कार्यालयास  माहीत नाही. याबाबत आमच्या वेबसाइडवर तक्रार केल्यास त्याची त्वरित दखल घेण्यात येईल.

-श्रीनिवासन नेगी, सुप्रिटंडन, पुरातत्व विभाग, मुंबई

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply