Breaking News

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पाली : प्रतिनिधी

सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पालीत  बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात भाविक पालीत दाखल होतात. या भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे रविवारी (दि. 26) पालीत वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारीही नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले.

उन्हाळी सुट्ट्यात पालीत रोजच भाविकांची गर्दी असते. सकाळपासूनच भाविक आपली वाहने तसेच लक्झरी बसमधून पालीत दाखल होतात. भाविकांच्या लहानमोठ्या वाहनांमुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. गावातील बल्लाळेश्वर मंदिर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एसटी स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये पालीत आहेत. त्यामुळे सुधागड तालुक्यासह अन्य ठिकाणचे नागरिक पालीत विविध कामांसाठी येत-जात असतात. पाली वाहतूक पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र  अरुंद रस्ते, नियम तोडणारे वाहनचालक, तसेच रस्त्याच्याकडेला उभी असलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनतो.

यामुळे होते पालीत वाहतूक कोंडी

पालीत खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची नियमीत ये-जा सुरु असते. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकदेखील वाहतूक कोंडीत भर घालतात. पालीतील रस्ते खूप अरूंद आहेत.  रस्त्याच्या दुतर्फा अनेक दुचाकी व मोठी वाहने उभी असतात. अनेक दुकाने, टपार्‍या व इमारती रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. काही ठिकाणी तर अनधिकृत बांधकामेदेखील बांधली गेली आहेत.  तसेच सुट्ट्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आसतात. त्यामुळे पालीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

महामार्ग फुलला वाहनांनी

Exif_JPEG_420
Exif_JPEG_420

नागोठणे : प्रतिनिधी

मे महिन्याची सुट्टी तसेच लग्नसराई यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर बाजूकडून कोकणाकडे जाणार्‍या वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, मुंबई -गोवा महामार्ग सध्या वाहनांनी फुलून गेला आहे. महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, जिते, वडखळ, रामवाडी भागात कायम वाहतुकीची कोंडी होत असतानाच काही बेदरकार वाहनचालक आपली गाडी पुढे नेण्याचे नादात मधेच घुसवत असल्याने त्याचा सर्वच वाहनांना त्रास भोगावा लागत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply