पनवेल : रामप्रहर वृत्त
होपमिरर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने बालदिनानिमित्त संपूर्ण नवी मुंबईत गरीब मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. संस्थेच्या या उपक्रमांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
होपमिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे जी अत्यंत लहान वयातच गरजूंना मदत करण्याची मानसिकता होती. नवी मुंबई आणि मुंबईत यशस्वीरित्या असंख्य उपक्रम कार्यान्वित करणे, 400 हून अधिक कुटुंबांना मदत करणे, महिला विभाग सुरू करणे आणि आता मुलांना मदत करणारी आशा, होपमिरर फाऊंडेशन नव्या उंचीवर पोहचली आहे.
या पथकाने 14 नोव्हेंबरला संपूर्ण नवी मुंबईत बाल दिवस उपक्रम चालविला होता. या मोहिमेस पनवेलमधील रॉयल किंग ग्रुपचे अनिकेत म्हात्रे आणि परम पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते जफर पिरजादा (सामाजिक कार्यकर्ते) यांचा विशेष सहभाग होता.
होपमिरर फाऊंडेशनच्या टीममधील सदस्य रमझान शेख, तुषार पोरजी, अदनान पिरजादा, करण दीक्षित, यास्मीन कच्ची, रुबीना खान, रमेश चौधरी आणि फरिन खान यांनी पुढाकार घेतला.