पनवेल : रामप्रहर वृत्त : पावसाळा तोंडावर आला असून, त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील विहिरींची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महापालिका हद्दीमध्ये अनेक विहिरी असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. त्यामुळे या विहिरींचे वापर होत नाही. त्यातील पाणी असेच वाया जाते. पावसाळ्यापूर्वी या विहिरी स्वच्छ केल्यास पावसाळ्यात त्यात पाणी साठून राहील, तसेच त्यातील जलस्रोत मोकळे होऊन ते जागृत होतील. पुढील काळात यातील पाणी वापरण्यायोग्य होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे नगरसेविका दर्शना भोईर यांनी विहिरी स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.