Breaking News

विखे-पाटलांसह चार आमदार भाजपच्या वाटेवर

मुंबई ः लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नसतानाच आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून प्रत्येकी एक आमदार, मुंबईतून एक आमदार आणि राधाकृष्ण विखे-पाटील जूनमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे व अब्दुल सत्तार हे तिघेही विखे-पाटलांसोबत भाजपात जाण्याची चिन्हे आहेत, तर आणखी दोन आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात एक गुप्त बैठक घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply