भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे जाहीर सभेत ग्वाही
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहर हे मिनी भारत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सलोख्याने एकत्रितपणे राहत आहेत, शहराच्या विकासाबाबत अनेक समस्या आहेत. निश्चित महायुतीचा उमेदवार निवडून आल्यानंतर या शहराच्या विकासाबाबत शंभर टक्के खात्री देतो, अगदी वेळ पडल्यास येथील नगराध्यक्षाला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी खोपोली येथे केले.
खोपोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात महायुती तर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे बोलत होते.
ते म्हणाले की, सरकार गतीमान पध्दतीने काम करत आहेत. संकल्प पत्र तयार केले आहे. 11 जाहीरनामा 11 वर्षे केंद्र सरकारने केले आहे. विविध प्रकल्प महायुतीने पुर्ण केले आहे. विकासाबरोबर रोजगारनिर्मिती केली आहे. मेट्रोसंदर्भात पावले उचलली जातील. विमानतळामुळे हा परिसरही विकसित होईल. यासाठी दुरदृष्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. कोविडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 80 कोटी जनतेला अन्नधान्य पुरविले, लस तयार केली, मोफत दिली. आयुष्य कार्ड, आरोग्य साठी, स्वावलंबन चा विचार, पाणी पुरवठा योग्य व्यक्तीचा हाती सत्ता द्या केंद सरकार आणि राज्य सरकार सर्व योजना पूर्ण करतील. जबाबदारी पुर्ण करू, असेही आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी या वेळी दिले.
व्यासपीठावर भाजप रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग, युवा नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस प्रकाश बिनेदार, खोपोली प्रभारी सुनील घरत, अल्पसंख्यांक सेलचे माजी अध्यक्ष अकबर सय्यद,
खोपोली भाजप अध्यक्ष अजय इंगुलकर, महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, महिला अध्यक्ष प्रिया जाधव, भाई शिंदे नरेश पाटील, यशवंत साबळे, माजी नगराध्यक्ष मोहन अवसरमल, नरेंद्र गायकवाड, सोनिया रुपवते, विजय पाटील यांच्यासह सर्व महायुतीचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूर या मतदारसंघात राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे केली तरी विरोधकांना ते दिसत नाही सातत्याने टीका करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत त्यांना टीका करू नये, आम्हाला विकास करायचा आहे. परवाच्या परिवर्तन नव्हे तर अपरिवर्तन च्या सभेत पुन्हा माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. महायुतीला खोपोली शहराचा विकास करावयाचा आहे यासाठी ही प्रलंबित कामे आहेत ती निश्चित निवडणुकीनंतर करण्याचा आमचा मानस असल्याची आमदार थोरवे यांनी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण तस्करी यांना पेट्रोलियम खात्याचा कारभार दिला आहे त्याबाबत पुनर्विचार करण्याबाबत लेखी पत्र देणार असल्याचे थोरवे यांनी सांगितले.
माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी सांगितले की, ट्रिपल इंजिन सरकार खोपोलीचा विकास करतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास पुढे आहे. हिंदी आई आणि मराठी मावशी आहे महाराष्ट्र खूप मोठ केले आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी खोपोली विकासाचा अजेंडा नाही फक्त टिकेचे लक्ष ठेवले, पाण्याची समस्या, मेट्रोची आवश्यकता, उपनगरीय लोकल सेवा व नवी मुंबई बस यांच्या मध्ये वाढ करावी, मैदान व आय टी आय समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, काजू वाडी गावढाण अधिकृत करणे, खोपोली शहराचे नंदनवन करायचे आहे, असे सांगितले. दरम्यान, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे,माजी नगरसेवक मोहन अवसरमल, अकबर सय्यद यांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडणून देण्याचे आवाहन खोपोलीकरांना केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper